www.24taas.com, वृत्तसंस्था, कोलकाता
कायद्याचा अभ्यास करणाऱ्या एका प्रशिक्षणार्थी तरुणीच्या (लॉ इंटर्न) लैंगिक शोषणाचे आरोप असलेले सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश ए. के. गांगुली यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. या तरूणीची जबानी सार्वजनिक झाली आहे. यामध्ये गांगुली म्हणालेत, तू सुंदर आहेस. मी तुझ्यावर प्रेम करतो.
पिडित तरूणीचा जवाब जाहीर झाल्याने न्या. ए. के. गांगुली यांनी पश्चिंम बंगाल मानवाधिकार आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे. तर तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा आणि कोलकाताच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राजीनाम्यासाठी दबाब वाढविला आहे.
अतिरिक्त सॉलिसिटर जनरल इंदिरा जयसिंग यांनी संबंधित पीडित तरूणीचा जवाब काही अंशी सार्वजनिक केले आहेत. तर दुसरीकडे पीडितेचे बयान सार्वजनिक केल्यामुळे न्या. गांगुली चांगलेच संतप्त झाले आहेत. एक गोपनीय जबाणी सार्वजनिक कसे केले जाऊ शकतात, असा संतप्त सवाल त्यांनी केला आहे.
दरम्यान, पीडित तरूणीनेने न्या. गांगुलींवर लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. गतवर्षी २४ डिसेंबरला दिल्लीच्या ली मेरिडियन हॉटेलच्या खोलीत रात्री ८ ते १०.३० दरम्यान न्या. गांगुली यांनी आपले लैंगिक शोषण केल्याचा तिचा आरोप आहे. भारताचे सरन्यायाधीश पी. सदाशिवम यांच्याद्वारे गठीत न्यायाधीशांच्या त्रिसदस्यीय समितीसमक्ष या पीडितेचे बयान नोंदवण्यात आले होते.
मानवाधिकार आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यायला हवा. ते नकार देत असतील तर त्यांना हटविण्यासाठी भारताच्या राष्ट्रपतींनी कारवाई करायला हवी. मी यासंदर्भात पंतप्रधानांना पत्र लिहिले आहे, असे जयसिंग यांनी म्हटले आहे. याप्रकरणी गठीत समितीने पीडितेसोबतच न्या. गांगुली यांच्याही बयाणाचे व्हिडिओ रेकॉर्डिंग केले आहे. त्यात गांगुलींनी स्वत:वरील आरोप धुडकावून लावत राजीनामा देण्यात नकार दिलाय.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.