नवी दिल्ली : मेरठमध्ये एका निवृत्त कर्नलच्या घरी डायरेक्टरेट ऑफ रेवेन्यू इंटेलिजेन्स (DRI)ने छापा मारला. निवृत्त कर्नल देवेंद्र कुमार आणि मुलगा नॅशनल शूटर प्रशांत बिश्नोईच्या घरावर गुप्त माहिती मिळाल्यानंतर ही छापेमारी करण्यात आली.
छाप्यात एक कोटी कॅश आणि सोबत काही हत्याकं देखील मिळाली आहेत. कर्नलच्या घरात जंगली प्राण्यांच्या शरीराचे काही भाग देखील मिळाले आहेत. DRI ने जवळपास १६ तास देवेंद्रच्या घरची झडती घेतली. सोबतच ४० रायफल ज्या वन विभागाच्या असल्याचं बोललं जातंय. दुर्लभ अशा काही प्राण्याचं ११७ किलो मांस देखील जप्त करण्यात आलं आहे.
मेरठमधील सिव्हिल लायन्स भागात ही कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत १ कोटी रुपयांची रोकड, जंगली जनावरांची चरबी, डोकं, शिंग असे अवयव सापडले असून शूटिंगच्या 40 रायफल्स आणि पिस्तुलीसह जवळपास 50 हजार जिवंत काडतुसंही जप्त करण्यात आली आहेत. जप्त केलेल्या प्राण्यांच्या अवयवांमध्ये दुर्मीळ आणि बंदी असलेल्या वन्यजीवांचे 117 किलो मांसाचाही समावेश आहे. यात सांभार, काळवीट, बिबट्याची कातडी, सांभाराची शिंगं आणि इतर अवयवांचाही समावेश आहे.
DIRच्या टीमनं या सा-या वस्तू सील केल्यात.. शनिवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास सुरु करण्यात आलेली ही कारवाई आज पहाटे साडेतीन वाजेपर्यंत चालली. 16 तास चाललेल्या या कारवाईत DIRच्या टीमला मोठं यश मिळालं आहे. DIRची टीम येणार असल्याची खबर मिळताच प्रशांत बिश्नोई फरार झाला आहे. धक्कादायक बाब म्हणजे या कुटुंबाकडं रायफल्स आणि पिस्तुलांचे लायसन्सही उपलब्ध नाहीत.