नवी दिल्ली : शेअर बाजारात अस्थिरता निर्माण झाल्याने शेअर बाजार गडगडलाय. याला स्थिरता देण्यासाठी केंद्र सरकार लघु बचत योजनांचे व्याज दर कमी करण्याची शक्यता आहे. केंद्राने तसे पाऊल उचलत राष्ट्रीय बचत योजना, किसान विकास पत्र, पोस्टातील ठेव योजना आणि पीपीएफ आदी योजनांत गुंतवणूक करणाऱ्यांसाठी ते नुकसानकारक ठरणार आहे.
व्याज दर कपात ही १ एप्रिलपासून होण्याची शक्यता आहे. लहान बचत योजनांसाठी ८.७ टक्के दर आहे. या व्याजदरात १ ते १.२५ टक्के घट होण्याची शक्यता आहे. आर्थिक क्षेत्राचे सचिव शक्तिकांत दास यांनी गुरुवारी ही माहिती देताना सांगितले, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांच्या संबंधीत योजनांवरील व्याज दर कपात होणार नाही.
सरकारी रोखे, बचत व्याजदर किंवा लहान बचत योजनांचे व्याज दर हे सरकारी वार्षिक आधारावरील व्हॅल्युव्हेशन करुन होत असत. आता प्रत्येक तिमाहीत व्हॅल्युव्हेशन करुन ठरविले जातील, असे दास यांनी स्पष्ट केले.
जागतिक शेअर आणि परकीय चलन बाजारातील घसरण पाहायला मिळत आहे. भारत त्याला अपवाद नाही. मात्र, एक दिवस भारताला ही नवीन समस्या होईल. म्हणून सरकार जागतिक आव्हाने हाताळण्यासाठी तयारी करत आहे.