गोवा : चेंजिंग रुममध्ये कॅमेरा : ४ जणांना अटक, ९ महिलांची चौकशी

गोव्यातील फॅब इंडिया शोरुमच्या चेंजिंग रुममध्ये केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी यांनी आज छुपा कॅमेरा पकडला. याबाबत  गुन्हा दाखल झाल्यानंतर ४ जणांना अटक केली असून ९ महिलांची पोलिसांनी चौकशी सुरु केली आहे. दरम्यान, संबंधित कॅमेरा सिल करण्यात आला  असून सीआयडी चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Updated: Apr 3, 2015, 09:16 PM IST
गोवा : चेंजिंग रुममध्ये कॅमेरा : ४ जणांना अटक, ९ महिलांची चौकशी title=

पणजी : गोव्यातील फॅब इंडिया शोरुमच्या चेंजिंग रुममध्ये केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी यांनी आज छुपा कॅमेरा पकडला. याबाबत  गुन्हा दाखल झाल्यानंतर ४ जणांना अटक केली असून ९ महिलांची पोलिसांनी चौकशी सुरु केली आहे. दरम्यान, संबंधित कॅमेरा सिल करण्यात आला  असून सीआयडी चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

स्मृती इराणी या सुटीनिमित्त गोव्यात आहेत. फॅब इंडिया शोरुममध्ये त्या खरेदीसाठी गेल्या होत्या. शोरुमच्या चेंजिंग रुम जवळ त्यांना छुपा कॅमेरा आढळून आला. त्यांनी स्थानिक आमदार मायकल लोबो यांना घटनास्थळी बोलावून घेतले. त्यानंतर त्यांनी गुन्हा दाखल केला आहे. 

पोलिसांनी फॅब इंडिया शोरुमविरोधात गुन्हा दाखल केला असून, याबाबत पुढील तपास सुरु आहे. चेंजिंग रूमच्या दिशेने कॅमेरा लावलेला दिसत होता, असे सूत्रांकडून सांगण्यात आले. तर  सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून, या भागातील अन्य दुकानांमध्येही अशाचप्रकारचे कॅमेरे लावण्यात आलेले आहेत का, याचा तपास पोलिसांकडून सुरु आहे. या प्रकणाचा छडा लावण्यासाठी सीआयडीमार्फत तपास करण्यात येईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.