अहमदाबाद : नवरात्रीदरम्यान होणाऱ्या गरबा कार्यक्रमांच्या बाबतीत गुजरातचे एक सूफी इमाम वादात अडकडलेत. राक्षसांनी गरबाला आपल्या ताब्यात घेतलंय. हे त्यांच्या मनोरंजनाचं साधन आहे, असं सूफी इमाम मेहदी हुसैन यांनी म्हटलंय.
‘गरबा काही धार्मिक सण नाही तर राक्षसांच्या मनोरंजनाचं एक साधन झालंय... गरब्यात साधू-संत दिसत नाहीत... यामध्ये सिने अभिनेते आणि अपराधिक पार्श्वभूमी असणारे भडकाऊ कपड्यांमध्ये नाचताना दिसतात...’ असं खेडा गावातील रहिवासी इमाम हुसैन यांनी म्हटलंय.
उल्लेखनीय म्हणजे, हे तेच सूफी इमाम आहेत ज्यांनी 2011 मध्ये गुजरातेच तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना जाहीर सभेत स्टेजवर जाऊन मुस्लिम टोपी घालण्याची विनंती केली होती... आणि मोदींनी ही टोपी घालण्याचा नकार दिल्यावर एका वादाला तोंड फुटलं होतं.
महत्त्वाचं म्हणजे, गोध्रामध्ये एका हिंदू संघटनेनं गरबा आयोजकांना अशा समारंभात मुस्लिम तरुणांना एन्ट्री न देण्याचा फर्मान सुनावला होता. त्यानंतर तथाकथित ‘लव्हजिहाद’ला आळा घालण्यासाठी गरबा कार्यक्रमामंत मुस्लिम युवकांना प्रवेश न देण्याच्या मागणीनं जोर धरला होता.
विश्व हिंदू परिषदेनं इमामांच्या या वक्तव्यावर जोरदार टीका केलीय. या वक्तव्यावर इमामांना अटक व्हायला हवी, अशी मागणी त्यांनी केलीय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.