प्रेमी जोडप्याची मृत्यूदंडाची शिक्षा सुप्रीम कोर्टातही कायम

सर्वोच्च न्यायालयाने एका प्रेमी जोडप्याला उच्च न्यायालयाने दिलेली मृत्यूदंडाची शिक्षा कायम ठेवली आहे. या दोघांना मुलीच्या कुटुंबातील सात सदस्यांची हत्या करण्याच्या गुन्ह्या अंतर्गत मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली गेली होती. सर्वोच्च न्यायालयाने ही शिक्षा कायम ठेवलीय. 

Updated: May 16, 2015, 04:03 PM IST
प्रेमी जोडप्याची मृत्यूदंडाची शिक्षा सुप्रीम कोर्टातही कायम title=

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने एका प्रेमी जोडप्याला उच्च न्यायालयाने दिलेली मृत्यूदंडाची शिक्षा कायम ठेवली आहे. या दोघांना मुलीच्या कुटुंबातील सात सदस्यांची हत्या करण्याच्या गुन्ह्या अंतर्गत मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली गेली होती. सर्वोच्च न्यायालयाने ही शिक्षा कायम ठेवलीय. 

चीफ जस्टिस एच. एल. दत्तू आणि न्यायधीश अरुण मिश्र यांनी ही शिक्षा सुनावताना, कुटुंबातील १० महिन्याच्या बालकासह सात जणांची हत्या करण्याची ही दुर्मिळातील दुर्मिळ घटना असल्याचं म्हटलंय. आरोपिंना त्यांच्या कृत्याचा पश्चातापही नाही. त्यामुळे त्यांच्यात काही सुधार होईल याची शक्यता फार कमी आहे, असंही सर्वोच्च न्यायालयानं म्हटलंय. 

सलीम आणि शबनमच्या वकिलाने याचिका दाखल केलेली की, शबनम ५ वर्षीय मुलाची आई आहे. जर दोघांना मृत्यूदंडाची शिक्षा दिली तर त्यांचा मुलगा अनाथ होईल. मात्र, न्यायालयाने वकिलांची ही याचिका फेटाळत सांगितले की, मुलांपेक्षा मुली कुटुंबाची जास्त काळजी घेतात. पालक मुलींवर डोळे झाकून विश्वास ठेवतात. त्याच मुलीकडून अशा कृत्याची अपेक्षा कुटुंबाला नसते.

त्यामुळे सर्वोच्च न्यायलयाने दोषी सलीम आणि शबनम यांची याचिका फेटाळत इलाहाबाद उच्च न्यायालयाने दिलेली शिक्षा कायम ठेवली आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.