नवी दिल्ली : 'नीट' परीक्षेबाबत सर्वोच्च न्यायालयाने विद्यार्थ्यांच्या याचिकेचा विचार न करता स्पष्ट केले की, ठरलेल्या वेळेप्रमाणे नीट परीक्षा घ्या, असे सर्वोच्च न्यायालय निर्देश दिलेत.
राज्य सरकारच्यावतीने शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी ठरल्या वेळेप्रमाणे सीईटी होईल, असे सांगितले. आम्ही कोर्टात बाजू मांडू असे सांगितले. त्यामुळे विद्यार्थ्यांमधील संभ्रमाचं वातावरण अजूनही संपले नाही. आता सर्वोच्च न्यायालयानेदेखील विद्यार्थ्यांची याचिका फेटाळली आहे.
नीट परीक्षेसंदर्भात विद्यार्थ्यांनी याचिका दाखल केली होती जी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. यामुळे ठरल्याप्रमाणे नीट परिक्षा १ मे रोजी होणार हे स्पष्ट झालं आहे.
सर्वोच्च न्यायलायने गुरुवारी दिलेला आपला निर्णय बदलण्याची मागणी फेटाळली आहे. यावेळी न्यायालयाने विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष देण्याचा सल्लाही दिला आहे.
दरम्यान नांदेडमध्ये विद्यार्थांनी जिल्हाधिका-यांनी निवेदन देत 'नीट'चा संभ्रम दूर करण्याची मागणी केली आहे. ४०० विद्यार्थी आणि पालक जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढले.