जयललिता बनल्या बाहुबलीच्या राजमाता

एकीकडे मुसळधार पावसामुळे चेन्नईला पुराने वेढलेले असताना चेन्नईतल्या नेत्यांना मात्र याचे काही नाही. पुरासारख्या नैसर्गिक आपत्तीच्या संकटातही आपली प्रतिमा कशी उजळेल याकडे या राजकारण्यांचे लक्ष लागलेय. 

Updated: Dec 5, 2015, 01:07 PM IST
जयललिता बनल्या बाहुबलीच्या राजमाता title=

चेन्नई : एकीकडे मुसळधार पावसामुळे चेन्नईला पुराने वेढलेले असताना चेन्नईतल्या नेत्यांना मात्र याचे काही नाही. पुरासारख्या नैसर्गिक आपत्तीच्या संकटातही आपली प्रतिमा कशी उजळेल याकडे या राजकारण्यांचे लक्ष लागलेय. 

पुरासारखे संकट कोसळल्यानंतरही नेल्लईमधील अण्णाद्रमुकचे आमदार एस मुथ्थुकरप्पन यांची मात्र पोस्टरबाजी सुरु आहे. तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांचे पोस्टर मुथुकरप्पन यांनी लावले आहे. 

यात जयललिता यांना बाहुबली चित्रपटातील राजमात शिवागामी यांच्या रुपात दाखवण्यात आले आहे. यात त्यांनी एका बाळाला हातात घेतलेय आणि त्या पुराच्या पाण्यातून वाट काढत आहेत. इतकेच करुन ते थांबले नाहीत तर त्या पोस्टरवर असे लिहिले की या कठीण परिस्थितीत एकट्या अम्मा लोकांचे जीव वाचवत आहेत. 

याव्यतिरिक्त मुख्यमंत्र्यांकडून पूरग्रस्त नागरिकांना दिल्या जाणाऱ्या खाण्यापिण्याच्या पाकीटांवरही जयललिता यांचा फोटो लावण्यात आलाय. सोशल मीडियावर या दोन्ही फोटोंवर जोरदार टीका केली जातेय. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.