नवी दिल्ली : 'म्रिया'... या रशियन शब्दाचा अर्थ आहे 'स्वप्न'... याच नावाचं एक विमान लवकरच भारतात दाखल होणार आहे... आणि हे 'स्वप्न' नाही तर सत्य आहे...
या विमानाची बांधणी पूर्ण झाली असून हे विमान लवकरच हैदराबादच्या 'राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळा'वर पाहायला मिळणार आहे.
यूक्रेन बनावटीचं अॅन्टॉनोव्ह एएन - २२५ 'म्रिया' हे विमान काही तांत्रिक कारणांसाठी रात्रभर हैदराबादच्या विमानतळावर दिसेल. पॅराग्वे ते पर्थ असं उड्डाण करताना हे विमान हैदराबादमध्ये काही काळासाठी उतरेल.
- हे एक कार्गो विमान आहे.
- शनिवारी १५ मे रोजी पहिल्यांदाच हे विमान पश्चिम ऑस्ट्रेलियाच्या एका खाण कंपनीचं १३० टन वजनी जेनरेटर पर्थपर्यंत घेऊन जाणार आहे.
- वजन मोठ्ठ असल्याकारणानं हे विमान आपल्या प्रवासात चार जागांवर प्रॉग, तुर्कमेनिस्तान, जकार्तासोबतच हैदराबादमध्येही उतरणार आहे.
- या विमानाची अधिकतम क्षमता २५० टन वाहून नेण्याची आहे.