लखनौ : उत्तर प्रदेश पोलिसांवर एक मोठी नामुष्की ओढवली आहे. लखनौ शहरात शनिवारी हजरतगंज जीपीओ भागात, रस्त्याच्या बाजूला बसून टायपिंग करणाऱ्या एका वृद्ध व्यक्तीला पोलिसाने मारहाण केली. एवढंच नाही तर त्याचं टायपिंग मशीनची तोडफोड केली.
करामत कॅमेऱ्यात कैद
मात्र दैनिक भास्करच्या कॅमेरामनने हे फोटो आपल्या कॅमेऱ्यात कैद केले, यानंतर या पोलिस इन्स्पेक्टरने हे फोटो डीलीट करण्याची धमकी दिली. तसेच माझं नाव मोठ्या अक्षरात लिही म्हणजे एसएसपीही मला ओळखतील.
दिवसाला ५० रूपये कमवणारा ६५ वर्षांचा वृद्ध
ज्या वृद्धाचं टाईपराटर तोडण्यात आलं, त्यांचं वय ६५ वर्ष आहे, आणि ते दिवसाला ५० रूपये कमावत होते. मात्र हे फोटो जेव्हा सोशल मीडियाच्या वेबसाईटसवर प्रकाशित झाले तेव्हा उत्तर प्रदेश सरकारचं गृह विभाग हादरलं.
मुख्यमंत्र्यांचे घरी जाऊन टाईपरायटर देण्याचे आदेश
मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी ज्या गृहस्थांचं टाईपरायटर तो़डण्यात आलं होतं, त्यांना ते घरी जाऊन परत करण्याचे आदेश दिले, संबंधित अधिकाऱ्यांनी त्यांना त्यांच्या घरी जाऊन टाईपरायटर परत केले, एक ऐवजी दोन टाईपरायटर त्यांना देण्यात आले, एक हिंदी आणि दुसरं इंग्रजीत टाईप करण्यासाठी होतं, मात्र त्यांनी हिंदीत टाईप करणारं स्वीकारलं. कारण ते हिंदीत टाईप करण्याचं काम करतात.
पोलिस इन्स्पेक्टर निलंबित
संबंधित पोलिस इन्स्पेक्टरला निलंबित कऱण्यात आलं आहे, कोणतीही कारवाई करतांना कुणाच्या मालमत्तेची, साहित्याची तोडफोड़ करण्याचे अधिकार पोलिसांनी नाहीत. यानुसार या संबंधित पोलिस इन्स्पेक्टरवर कारवाई करण्यात आली आहे. एका चहावाल्याचं दुकानंही या महाशयांनी त्याचवेळी फेकून दिल्याने, रस्त्यावर दूरपर्यंत दुध सांडलं होतं.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.