रेल्वेनं रात्री प्रवास करणाऱ्या प्रवाशांनो सावधान!

ट्रेनमध्ये होणाऱ्या अपराधांना कमी करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. मात्र हे अपराध कमी होण्याऐवजी वाढत चालले आहेत. ट्रेनमध्ये होणाऱ्या चोरीची बरीच प्रकरणं समोर आली आहेत.

Updated: Mar 16, 2015, 01:31 PM IST
रेल्वेनं रात्री प्रवास करणाऱ्या प्रवाशांनो सावधान! title=

नवी दिल्ली : ट्रेनमध्ये होणाऱ्या अपराधांना कमी करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. मात्र हे अपराध कमी होण्याऐवजी वाढत चालले आहेत. ट्रेनमध्ये होणाऱ्या चोरीची बरीच प्रकरणं समोर आली आहेत.
 

रेल्वे मंत्रालयानं जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार २०१२ मध्ये चोरीची ५,१७४ प्रकरणं समोर आली. २०१३ मध्ये वाढून तो आकडा  ६,२५८ वर गेला आणि २०१४ मध्ये हा आकडा ७,६०६ पर्यंत गेला आहे.  चोरीच्या सर्वात जास्त १,७५४ घटना पश्चिम-मध्य रेल्वे विभागात झाल्या आहेत. मध्य रेल्वे विभागात १,२८१ आणि दक्षिण रेल्वे विभागात १,००८ घटना समोर आल्या आहेत.

'प्रवाशांची सुरक्षा ही आमची प्राथमिकता आहे आणि रेल्वे परिसरात होणाऱ्या या अनुचित घटना आमच्यासाठी चिंतेचा विषय आहे. या घटना कमी करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत', असं रेल्वे मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकऱ्यानं सांगितलं.