नवी दिल्ली : जागतिक मंदी असली तरी भारती अर्थव्यवस्था मजबूत स्थितीत असल्याचं सांगत आपल्या अर्थसंकल्प २०१६ च्या वाचनाला भारताचे अर्थमंत्री अरुण जेटली यांनी केली.
'इंटरनॅशनल मॉनेटरी फंड'नं (IMF) मात्र भारताच्या अर्थव्यवस्थेचं कौतुक केलंय, असाही उल्लेख जेटलींनी आपल्या भाषणात केला.
आपल्या भाषणात १ मे २०१८ पर्यंत सर्व गावांत वीज पोहचवण्याचं लक्ष्य अरुण जेटली यांनी बोलून दाखवलंय. गरीब आणि गावांतील लोक सरकारची प्राथमिकता आहे, असं सांगत ग्रामीण विद्युतीकरणासाठी मोठी तरतूद करण्यात येणार असल्याचं त्यांनी जाहीर केलंय.
आत्तापर्यंत ५५४३ गावांचं विद्युतीकरण करण्यात आल्याचा उल्लेखही त्यांनी आपल्या भाषणात केला. ग्रामीण विद्युतीकरणासाठी ८५०० कोटींची तरतूद करण्यात आलीय.