अलीगड : जम्मू काश्मीरच्या उरीमध्ये दहशतवादी हल्ल्या संदर्भात फेसबूकवर आपत्तीजनक टीप्पणी करणारी पोस्ट एका काश्मीरी युवकाने टाकल्यानंतर अलीगड मुस्लिम विद्यापीठाच्या (AMU)चे कुलगुरू जमीरद्दीन शाह यांनी या विद्यार्थ्याची विद्यापीठातून हकालपट्टी केली आहे.
उरीमध्ये लष्कराच्या बेस कॅम्पवर दहशतवादी हल्ल्यात १८ जवान शहीद झालेत. या संदर्भात मुदस्सर युसूफ नावाच्या विद्यार्थ्याने फेसबूकवर आपत्तीजनक पोस्ट टाकली होती. यावर कुलगुरू यांनी कारवाई केल्याने एएमयूचे प्रवक्ता राहत अबरार यांनी सांगितले.
शाह यांच्यानुसार एएमयूमध्ये देशविरोधी भावनांना हवा देण्याच्या कोणत्याही कृतीला खपवून घेतले जाणार नाही.
श्रीनगरचा राहणारा युसूफ एएमयूमध्ये कार्बनिक रसायन शास्त्रचा विद्यार्थी होता. रविवारी युसूफने कुलगुरूंची भेट घेतली होती, तसेच आपण भावनेच्या भरात ही पोस्ट टाकली. या संदर्भात अलीगडचे भाजप खासदार सतीश कुमार गौतम यांनी कुलगुरूला पत्र पाठवून दोषी विरोधात कारवाई करण्याचा मागणी केली होती.