www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
नोएडामधील हायप्रोफाईल आरूषी हत्याकांड प्रकरणी गाझीयाबादचं सीबीआय कोर्ट आज निकाल देणार आहे. शेवटपर्यंत गूढ असलेल्या या हत्याकांड प्रकरणामुळे सर्वांचं कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष लागलं आहे. कारण आरूषीचा खून तीच्या आई-वडीलांनी केला की दुसरं कोणी? हे निकालातून समोर येणार आहे.
आरूषीचा १६ मे २००८ ला सकाळी खून झाल्याची खबर वाऱ्यासारखी पसरली... आणि नोएडातील जलवायू विहारला पोलीस आणि प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींचा गराडा पडला... बंद घरात कोणी चौथी व्यक्ती येऊन आरूषीचा खून कसा काय केला, असा प्रश्न प्रत्येकाला पडला होता.
दबल्या आवाज आरूषीचा खून तीच्या आई-वडीलांनी म्हणजे तलवार दाम्पत्याने केला असं बोललं जात होतं. पण आरूषीचा खून नोकर हेमराजनं केल्याचं तलवार दाम्पत्य वारंवार सांगत होतं. त्यानुसार पोलीसांनी हेमराजचा कसून शोध सुरू केला. आरूषीचा खून हेमराजनचं केल्याचं सर्वांना वाटत होतं. कारण आरूषीच्या खूनानंतर हेमराज गायब होता...
पण पुढच्या २४ तासात सर्वकाही बदललं. ज्या हेमराजवर आरूषीच्या खूनाचा संशय होता त्याचाच खून झालेला होता... पोलीसांची तपासाची चक्र फिरली आणि छताच्या दरवाजापर्यंत ते पोहचले. त्यांनी दाराचं कुलूप तोडंल आणि त्यांना आरूषीच्या इमारतीच्या छतावर हेमराज मृतदेह आढळून आला. विशेष म्हणजे आरूषी आणि हेमराजच्या खूनामध्ये फक्त १५ मिनिटांचं अंतर होतं... आरूषीच्या रूमपासून ते छतापर्यंत रक्ताचे डाग ठिकठिकाणी दिसून आले... घरातल्याच व्यक्तीने हे खून केले आहेत असे पुरावे सांगत होते. त्यामुळे पोलीसांवर निष्काळजीपणाचे गंभीर आरोप झाले..
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.