मुंबई : महात्मा गांधी यांची जयंती... स्वातंत्र्याचे महानायक ठरलेल्या गांधींच्या जीवनाचं एकच उद्देश होता.... ते म्हणजे देशाचं स्वातंत्र्य... त्यांचं एक आणखी स्वप्न होतं... ते म्हणजे स्वच्छता...
गांधीजींचं हेच व्रत आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हाती घेतलेलं दिसतंय... स्वत: रस्त्यावर उतरून मोदी झाडूही हातात घेताना दिसलेत... पण, सुधाराची गती खूपच कमी होती... याला कारणीभूत आहे आपली मानसिकता किंवा स्वच्छतेप्रती असलेली उदासीनता...
गांधी जयंतीनिमित्त खासदार विजय गोयल यांनी काही फलक साबरमती परिसरात झळकावलेत. या फलकांवर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महात्मा गांधी यांची तुलना केलीय. मोदी हे सांबरमतीचे संत आहेत, असाही उल्लेख इथं करण्यात आलाय.
गांधींजींचं स्वच्छतेचं व्रत हातात घेतलेले पंतप्रधान मोदी आजच्या काळातले गांधी आहेत का? पाहा...
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.