हिंदू गोमांस का खात नाहीत, ऐका एका पाकिस्तानीच्या नजरेतून...

बीफ खाण्यावरून भारतात उठलेलं वादळ, शिवसेनेचा पाकिस्तानी कलाकारांना विरोध या मुद्द्यावरून जसं भारतात चर्चेला उधाण आलं तशाच अनेक चर्चा पाकिस्तानी मीडियामध्येही झडल्या. 

Updated: Jan 16, 2016, 10:43 AM IST
हिंदू गोमांस का खात नाहीत, ऐका एका पाकिस्तानीच्या नजरेतून...  title=

मुंबई : बीफ खाण्यावरून भारतात उठलेलं वादळ, शिवसेनेचा पाकिस्तानी कलाकारांना विरोध या मुद्द्यावरून जसं भारतात चर्चेला उधाण आलं तशाच अनेक चर्चा पाकिस्तानी मीडियामध्येही झडल्या. 

अशाच एका चर्चेचा व्हिडिओ सध्या व्हायरल झालाय. या व्हिडिओत पाकिस्तानी पत्रकार, लेखक - विश्लेषक हसन निसार यांनी एका पाकिस्तानी न्यूज चॅनलशी बोलताना हिंदू गोमांस का खात नाहीत? या मुद्यावर भाष्य केलंय. यासाठी त्यांनी काही हिंदूत्ववादी पुस्तकांचा आधारही घेतलाय.  

 

शिवसेना जाहील-अनपढ

या चर्चेदरम्यान सुधींद्र कुलकर्णी यांना काळं फासणाऱ्या 'शिवसेनेला हिंदूत्वाचं मूळही माहीत नाही...  हे भाई लोक आहेत... देवांचा धंदा करणारे हे लोक आहेत' असंही त्यांनी म्हटलंय.