फरिदाबाद : केंद्रातील मोदी सरकारमधील मंत्री व्ही. के. सिंग यांनी केलेल्या वक्तव्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची डोकेदुखी वाढविली आहे. हरियाणातील घटनेबाबत वादग्रस्त विधान केलेय. येथील घटनेचा संबंध कुत्र्याशी लावला आहे.
फरिदाबादमधील दोन दलित मुलांच्या हत्येशी सरकारचा काहीही संबंध नसल्याचे केंद्रीय मंत्री व्ही. के. सिंग यांनी आज सांगितले. 'जर एखाद्याने कुत्र्याला दगड मारला, तर सरकारला त्यासाठी जबाबदार मानता येणार नाही, असे धक्कादायक विधान केले. सिंग यांच्या या वादग्रस्त विधानाचे तीव्र पडसाद उमटण्याची शक्यता आहे.
गाझियाबाद येथील एका कार्यक्रमात हरियाणातील घटनेसंदर्भात सरकार अपयशी ठरले आहे काय, असा प्रश्न सिंग यांना विचारण्यात आला. या घटनेचा संबंध सरकारशी जोडू नका. दोन कुटुंबांमधील भांडणाचे हे प्रकरण असून आता त्याची चौकशी करण्यात येत असल्याचे ते म्हणालेत.
या घटनेचे तीव्र पडसाद उमटण्यास सुरुवात झालेय. अनेक राजकिय नेत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. सरकारला विरोधकांनी तीव्र टीकेचे लक्ष केलेय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.