अमरावती : आंध्रप्रदेशची नवी राजधानी अमरावतीचे भूमीपूजन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले.
देशातली पहिली संपूर्ण स्मार्ट सिटी म्हणून अमरावतीची ओळख प्रस्थापित करण्याचा ध्यास आंध्रचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी घेतलाय. त्या दृष्टीनं गेले अनेक दिवस प्रयत्न सुरू होते. याच प्रयत्नातून आज आंध्रला मिळणाऱ्या नव्या राजधानीचं भूमीपूजन मोदींच्या हस्ते झाले.
या कार्यक्रमासाठी जवळपास १ लाख लोकांना निमंत्रणं पाठवण्यात आली होती. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत अनेक दिग्गज उपस्थित होते. त्यासाठी अमरावतीत ७ हेलिपॅड्स आणि ७ तात्पुरते पूल उभारण्यात आलेत. स्मार्ट सिटीच्या प्रकल्पासाठी सिंगापूरचं विशेष सहाय्य घेण्यात येणार आहेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.