Hardik Pandya: ICC चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील ब्लॉकबस्टर सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर 23 फेब्रुवारी रोजी खेळला जात आहे. या सामन्यात पाकिस्तानचा कर्णधार मोहम्मद रिझवानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात टीम इंडियाच्या गोलंदाजीची सुरुवात अजिबात खास नव्हती. सुरवातीला अनेक वाइड देण्यात आले. पण हार्दिक पांड्या आपले 9 वे षटक टाकायला येताच त्याने बाबर आझमची विकेट घेत टीम इंडियाला पाहिलं यश मिळवून दिलं.
बाबरच्या विकेटसह हार्दिक पांड्याने भारताचे विकेट्सचे खाते उघडले. पण चर्चेत अजून एक गोष्ट आली ती म्हणजे त्याच्या विकेट सोबत टीव्ही स्क्रीनवर अचानक दिसलेला एक चेहरा. या व्यक्तीने केलेले सेलिब्रेशन. ती तरुणी हार्दिकची नवीन लेडी लव्ह आहे का? अशी चर्चा होत आहे. ही व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून जास्मिन वालिया होती. काही वेळेपासून जास्मिन वालिया ही हार्दिक पांड्याची कथित गर्लफ्रेंड असल्याचे म्हटले जाते. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना पाहण्यासाठी जस्मिन वालिया दुबईतील स्टेडियममध्ये पोहोचली.
Hardik Pandya 's rumoured Girlfriend Jasmin Walia spotted in the stadium #INDvsPAK #ChampionsTrophy #HardikPandya pic.twitter.com/x9r1RzWwv8
— अभि (@abhi7781_) February 23, 2025
हार्दिक पंड्याने बाबर आझमची विकेट घेताच जस्मिन वालियाने आनंद व्यक्त करत उद्या मारताना दिसली. जस्मिन वालिया ही भारतीय वंशाची ब्रिटिश गायिका आहे. तिने बॉलीवूड चित्रपटांमध्येही आपला आवाज दिला आहे. जस्मिन तिच्या गाण्यासोबतच हार्दिकसोबतच्या जोडलेल्या नावामुळेही चर्चेत आहे. हार्दिक पांड्याने मागील वर्षीच त्याची माजी पत्नी नताशा स्टॅनकोविक हिला घटस्फोट दिला होता.
हे ही वाचा: IND vs PAK LIVE Score: पाकिस्तानचा अख्खा संघ तंबूत, भारतासमोर विजयासाठी 242 चं आव्हान
नताशापासून घटस्फोट घेतल्यानंतर, हार्दिक सोशल मीडियावर अशा ठिकाणी दिसला जिथे जास्मिन देखील सुट्टीसाठी गेली होती. दोघांनीही त्याच ठिकाणाहून त्यांचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. त्यामुळेच हार्दिक आणि जस्मिनच्या नात्याची चर्चा रंगली होती. अशा स्थितीत जस्मिनला दुबईत पाहिल्यानंतर त्यांच्या नात्यावर शिक्कामोर्तब झाल्याचे दिसते.