भोपाळ : व्यापम घोटाळ्याची सीबीआय चौकशी करण्यात आपली कोणतीही हरकत नाही, व्यापम घोटाळ्याची सीबीआय चौकशी व्हावी, असं पत्र मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी उच्च न्यायालयाला लिहणार आहेत.
मध्य प्रदेश व्यावसायिक मंडळामधील (व्यापमं) गैरव्यवहाराशी आपला कोणताही संबंध नसल्याचा दावा यावेळी शिवराज सिंह चौहान यांनी आज केला.
व्यापमं प्रकरणी मध्य प्रदेशची राजधानी असलेल्या भोपाळ येथे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना चौहान यांनी ही माहिती दिली.
व्यापमं गैरव्यवहार उघडकीस आल्यापासून या प्रकरणाशी संबंधित 45 जणांचा मृत्यू झाला असून, याची जबाबदारी सरकारचीच आहे, असा काँग्रेसचा दावा आहे.
भाजपने मात्र काँग्रेसच्या आरोपांचा इन्कार केला असून, सीबीआयकडे चौकशीची मागणी करण्यास कोणतीही अडचण नसल्याचे म्हटले आहे. तसेच, काँग्रेस मृत्यूसारख्या घटनांचे राजकारण करत असल्याचा आरोपही यावेळी शिवराज सिंह चौहान यांनी केला.
या प्रकरणी सीबीआयतर्फे तपास करण्यात यावा, अशा आशयाचे पत्र सरकारतर्फे न्यायालयास दिले जाईल, असे आश्वासन चौहान यांनी यावेळी दिले.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.