हैदराबाद : बीफ वरील राजकारण अजून थांबण्याचं नाव दिसत नाही. हैदराबादचे खासदार असाद्दुदीन ओवेसी यांनी आज एक खळबळजनक वक्तव्य केले आहे.
हैदराबाद महानगर पालिका निवडणुकीच्या प्रचार सभेत ते बोलत होते. एआयएमआयएमचे प्रमुख आपल्या पक्षाच्या प्रचार करण्यासाठी घेण्यात आलेल्या सभेत म्हणाले, की तुम्हांला जर यापुढे बीफ खायचे असेल तर आमच्या पक्षाला मत द्या.
जर एमआयएम या निवडणुकीत पराभूत झाली तर मी सांगतो अल्प संख्याक समाजाने बीफ खाणे विसरून जावे, असे वादग्रस्त वक्तव्य केले आहे.
तसेच त्यांनी महाराष्ट्रातील भाजप प्रणित सरकारवर आरोप करताना सांगितले की, गरीब मुसलमान आणि दलित यांच्या विरोधात सरकार असून त्यांनी जाणून बुजून बीफ बंदी केली आहे. पण पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी जेव्हापासून विराजमान झाले तेव्हापासून भारतातून बीफचे एक्सपोर्ट वाढले आहे. बीफ निर्यात १७ टक्क्यांन वाढली आहे.
पंतप्रधान मोदींची मिमिक्री
ओवेसी यांनी या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मिमिक्री केली. मित्रो म्हणून त्यांनी भाषणाची सुरूवात केली.