नवी दिल्ली : आपल्या पाच वर्षांच्या मुलाला जवळ घेत काही सूचना केल्यानंतर एका आईनं गळफास लावून घेऊन आत्महत्या केल्याची घटना दिल्लीत घडलीय.
राजधानी दिल्लीच्या आर. के. पुरम भागात ही धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना समोर आलीय. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 23 वर्षांची रोबा आपल्या कुटुंबासोबत सेक्टर 10 च्या सर्व्हंट क्वॉर्टरमध्ये राहत होती. रोबाला दोन मुलं आहेत. लहान मुलगा एका वर्षांचा आहे तर मोठा मुलगा पाच वर्षांचा...
चौकशी दरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, रोबाचा पती सोनू आणि रोबा यांचं रात्री शुल्लक कारणावरून भांडण झालं होतं. सोनू प्रायवेट जॉब करतो तर रोबा आर्मिच्या एका ब्रिगेडियरकडे घरकाम करत होती. सोनू नाईट ड्युटीसाठी निघून गेल्यानंतर रोबानं आपल्या पाच वर्षांचा मुलाला आपल्याजवळ बोलावून घेतलं... मी फाशी घेतल्यानंतर दरवाजा उघड आणि पप्पांना फोन करून आई मेल्याचं कळवं, असं तिनं आपल्या पाच वर्षांच्या मुलाला सांगितलं आणि दरवाजा बंद करून घेतलंही हृदयद्रावक घटना रोबाच्या मुलानं पोलिसांकडे कथन केलीय.
मुलानंही आपल्या आईने सांगितल्याप्रमाणेच केलं. आईला फाशीवर लटकताना पाहिल्यानंतर तिच्या मरण्याची वाट पाहून या चिमुरड्यानं आपल्या वडिलांना फोन केला. त्यानंतर सोनू घरी पोहचला.
रोबाचं शव शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आलंय. पोलिसांची अधिक चौकशी सुरू आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.