काश्मीरप्रश्नी युध्द पाकिस्तानला परवडणारं नाही

पाकिस्तानचे पंतप्रधान युसूफ रझा गिलानी यांनी काश्मीर समस्या चर्चा आणि राजनैतिक मार्गानेच सोडवावा लागेल कारण पाकिस्तानला २१व्या शतकात युध्द परवडणार बाब नसल्याचं मान्य केलं.

Updated: Feb 6, 2012, 11:19 AM IST

www.24taas.com, इस्लामाबाद 

 

पाकिस्तानचे पंतप्रधान युसूफ रझा गिलानी यांनी काश्मीर समस्या चर्चा आणि राजनैतिक मार्गानेच सोडवावा लागेल कारण पाकिस्तानला २१व्या शतकात युध्द परवडणारी बाब नसल्याचं मान्य केलं. काश्मीरच्या प्रश्नावर आता पर्यंत चार युध्द झाली आहेत आणि अद्याप हा प्रदेश दोन्ही देशांमधला तणावाचा मुद्दा राहिला असला तरी युध्द आम्हाला परवडणार नाही असं गिलानी म्हणाले. पाकिस्तानच्या परराष्ट्र धोरणात काश्मीर समस्या कायम केंद्रस्थानी राहल्याचंही ते म्हणाले.

 

काश्मिरी जनतेला नैतिक, राजकीय आणि राजनैतिक पाठबळ देण्यासाठी आम्ही कटीबध्द असल्याचं त्यांनी सांगितलं. तसंच संपूर्ण राष्ट्र सर्व राजकीय पक्षांचे काश्मीरच्या मुद्दावर एकमत असल्याचंही गिलानी म्हणाले. पाकिस्तान एक जबाबदार राष्ट्र तसंच जबाबदार अणवस्त्र सज्ज राष्ट्र असल्याने त्यांना जबाबदार धोरणांचा मार्ग स्विकारवा लागेल. पाकिस्तानातील जनतेच्या प्रतिनिधींनी राष्ट्रीय सहमतीच्या मार्गाने धोरणांची आखणी केली पाहिजे असं ते म्हणाले.