www.24taas.com, वॉशिंग्टन
अमेरिकेतील ज्येष्ठ उद्योगपती मिट रोमनी यांनी रिपब्लिकन पार्टीमार्फत राष्ट्राध्यक्ष पदावर दावेदारी सांगितली आहे. त्यामुळे व्हाईट हाऊसवर कोणाचं वर्चस्व राहणार यावरून मिट रोमनी आणि विद्यमान राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्यात जोरदार चुरस होण्याची शक्यता आहे.
रिक सेंटरोम शर्यतीतून बाहेर पडल्यामुळे रोमनी यांचा मार्ग मोकळा झाला आहे. सेंटरोम आणि रोमनी कट्टर प्रतिस्पर्धी मानले जातात. सेंटरोम यानी मंगळवारी शर्यतीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे राष्ट्राध्यक्षपदासाठी रोमनी आणि बराक ओबामा यांच्यात सरळसरळ लढत होणार आहे.
मिट रोमनी मॅसॅच्युसेट्सचे माजी गव्हर्नर आहेत. फेब्रुवारीमध्ये झालेल्या फ्लोरिडा प्रांतातील प्राथमिक निवडणुकीत त्यांनी आपले प्रतिस्पर्धी न्यूट गिनग्रीच यांच्यावर मोठी आघाडी मिळवली होती.त्यामुळेचआता रोमनी पुढील अध्यक्षीय निवडणुकीत बराक ओबामा यांना आव्हान द्यायला उभे राहले आहेत..