www.24taas.com, इस्लामाबाद
पाकिस्तानच्या सिंध प्रांतात सहा पाय असलेल्या एक बालक जन्माला आले आहेत. मात्र, या बाळाचे अतिरिक्त पाय वेगळे करणे ही खूपच गुंतागुतीची आणि वेळखाऊ शस्त्रक्रिया असल्याचे मत डॉक्टरांनी व्यक्त केले आहे.
या बाळाने पाकिस्तानच्या सिक्कूर गावात जन्म घेतला असून गेल्या सोमवारीच त्याला कराची येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ चाइल्ड हेल्थ (एनआयसीएच) येथे हलविण्यात आले.
या बाळाच्या शरिराला आणखी दोन जुळ्या बाळांचे पाय जोडले गेले असल्याचे एनआयसीएचचे संचालक जमाल रजा यांनी सांगितले.
या अतिरिक्त जुळ्यांपैकी एक जिवंत असून दुसरा परजीवी आहे. बालकाला इन्स्टिट्यूटच्या अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती स्थीर आहे. परंतु, हे परजीवी पाय पाय शरिरापासून वेगळे करणे अत्यंत किचकट प्रक्रिया असून ती वेळखाऊही असल्याचे रजा यांनी सांगितले.
पाच डॉक्टरांचे पथक या बाळावर शस्त्रक्रिया करणार असल्याचेही रजा यांनी सांगितले. या बाळाचे वडील इमरान अली शेख हे एक्स रे टेक्निशयन असून पाच वर्षांपूर्वी त्यांनी अफसान यांच्याशी लग्न केले आहे. हे बाळ त्यांचे पहिले आपत्य आहे.