www.24taas.com, वृत्तसंस्था, ऑस्ट्रिया
ऑस्ट्रियाची `दी बिअर्डेड् लेडी` म्हणून प्रसिद्ध असलेली गायिका कॉन्चिटा व्रुस्ट हिनं शनिवारी १० मे पार पडलेली `युरोव्हिजन साँग` स्पर्धा जिंकली. जगभरातील ४५ देशांतून जवळजवळ १८० दशलक्ष प्रेक्षकांनी टिव्हीवरून या स्पर्धेचा आनंद लुटला.
कॉन्चिटाचं वैशिष्ट्य म्हणजे या गायिकेला चक्क पुरुषांप्रमाणं दाढी आहे. या संगीतस्पर्धेत प्रथम आलेली व्रुस्ट उंच टाचाची चप्पल, सुंदर नक्षीदार ड्रेस, डोळ्यात काजळ आणि गालावर पूर्ण वाढलेली दाढी ठेऊन कार्यक्रमाच्या ठिकाणी उपस्थित होती. हा क्षण म्हणजे माझ्यासाठी स्वप्न प्रत्यक्षात उतरल्याची अनुभूती आहे. केवळ भविष्यात घडलेल्या घटनांचा विचार न करत राहता आयुष्यात पुढं जात काहीतरी भव्यदिव्य साध्य करीत मार्गक्रमण करत राहाणारी लोक मला समाजात दिसल्याचं मनोगत पारितोषिक जिंकल्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना या २५ वर्षीय गायिकेनं व्यक्त केलं.
व्रुस्टचं खरं नाव टॉम न्यूविर्थ असं आहे. नेदरलॅण्डमध्ये आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाची `समाजातील दुर्लक्षित` ही मुख्य संकल्पना होती. यासाठी `गे` समुदायाच्या मानाचं प्रतिक म्हणून मागील आठवड्यात कोपेनहेगन शहराच्या अनेक भागात इंद्रधनुष्यी सप्तरंगी झेंडे उभारण्यात आले होते. यावेळी बोलताना व्रुस्टचे कामकाज पाहणारा तिचा एजन्ट रेने ब्रेटो म्हणाला, आपण फक्त काही जणांचे मत परिवर्तन करू शकतो, असं मला वाटते.
ही फक्त दाढी असलेली तरुणी आहे, परंतु, तिला पाहताच आपण चंद्रावर वगैरे आल्यासारखे वागतो. १९६६ नंतर हा पुरस्कार पटकावणारी व्रुस्ट ही पहिली ऑस्ट्रियन गायिका आहे. प्रेक्षकांनी तिला मोठ्या प्रमाणावर दाद दिली असली, तरी काही देशात तिच्यावर टीका करण्यात आली. बेलारुस, अरमानिया आणि रशियामध्ये तिच्याविरुद्ध ऑनलाईन दावे दाखल करण्यात आले.
लहान मुलांमध्ये गे प्रवृत्तीला प्रसिद्धी देण्याविरोधात या देशांतील सरकारांनी मागील वर्षी कायदा आणला आहे. यामुळं या देशांत सदर कार्यक्रम प्रसारित करताना व्रुस्टचा भाग काढण्यात तरी आला किंवा तो संपादित करून दाखविण्यात आला, असं असलं तरी, व्रुस्टचा ऑस्ट्रियन चाहता डामेल सारिक यानं आम्ही करून दाखवलं. ही सर्वात रोमांचक घटना आहे. ती जिंकणार हे मला माहिती होतं. मला तशी खात्री होती, असे विचार व्यक्त केले आहेत. डामेल केवळ या क्षणाचा साक्षीदार होण्यासाठी ऑस्ट्रियावरून कोपेनहेगनला आला होता.
१९५६ पासून भरविण्यात येणारी दी युरोव्हिजन स्पर्धा ही `वर्ल्ड वॉर टू`मधील दुर्लक्षितांच्या मदतीसाठी आयोजित करण्यात येते. हा एक अराजकीय उपक्रम असला, तरी या वर्षी काही राजकारण्यांनी या संधीचा लाभ उचलण्याचा प्रयत्न केला.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.