www.24taas.com, वृत्तसंस्था, न्यूयॉर्क
फोर्ब्सनं नुकतीच अमेरिकेतल्या ५० परोपकारी व्यक्तींची यादी जाहीर केलीय. या यादीत नंबर १ वर आहे मायक्रोसॉफ्टचे अध्यक्ष बिल गेट्स आणि त्यांची पत्नी मेलिंडा. अमेरिकेतील सर्वात मोठे समाजसेवी आणि देणगीदार हे दोघं ठरले आहेत.
या जोडप्यानं जवळपास दोन अब्ज डॉलर्स, वेगवेगळ्या परोरकारी (धर्मादाय) कामासाठी दान दिले आहेत. वेगवेगळ्या सेलिब्रिटींद्वारं देण्यात आलेल्या देणगीच्या रक्कमेचा हिशोब ठेवण्यासाठी मॅगझिननं ही यादी तयार केलीय.
गेट्स जोडप्यानं २०१२मध्ये एकूण १.९ अरब डॉलर दान केले. ही जोडी आपल्या ‘बिल अॅड मेलिंडा गेट्स फाउंडेशन’ द्वारं भारतासह वेगवेगळ्या देशामध्ये पोलिओ आणि मलेरिया निर्मूलनासाठी कार्य करत आहेत.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.