www.24taas.com, बीडिंग
आजच्या काळात करिअरमध्ये गुरफटून गेलेल्या तरूण पीढीला लग्न संसारासाठी वेळच नसल्याचं दिसू लागलंय. त्यातही एकटं राहून नैराश्य येऊ लागलेल्या तरुणांची संख्या वाढू लागली आहे. चीनसारख्या देशाने याचाही वापर करून नवा बिझनेस सुरू केला आहे. एकटं आणि अविवाहीत तरुण वर्गासाठी भाड्याने बॉयफ्रेंड पुरवण्याचा नवा बिझनेस सुरू होत आहे.
चीनमधील सर्वांत मोठं बिझनेस पोर्टल असणाऱ्या ‘ताओबाओ.कॉम’ने चीनी नववर्षाच्या निमित्ताने ही सेवा सुरू होत आहे. अनेक ठिकाणी तरुण-तरुणींना त्यांच्या लग्नाबद्दल प्रश्न विचारले जातात. अशावेळी त्यांना उत्तर देण्यासाठी भाड्याने बॉयफ्रेंड पुरवण्यात येत आहेत. भाड्याचे बॉयफ्रेंड मुलीला किसदेखील करू शकतील. चीनमध्ये दिवसेंदिवस हा बिझनेस वाढत आहे. याला प्रतिसाददेखील चांगला मिळत आहे. या कामासाठी साधारण २५००० रुपये आकारले जातात.
चीनमध्ये साधारण १८ कोटी तरुण एकटे आहेत. या तरुणांच्या एकटेपणाची समस्या सोडवण्यासाठी हा बिझनेस सुरू केला आहे. अशा तरुणांना लोकांमध्ये वावरताना एखादा साथीदार असला, की बरेसचे प्रश्न सुटतात. मात्र हा प्रकार योग्य नसल्याचं मत तरुणांचे नातेवाईक तसंच मानसशास्त्रज्ञ व्यक्त करत आहेत.