वॉशिंग्टन : जगात नेहमी काहीतरी विलक्षण घडत असतं... ब्राझीलमधील एका नागरिकाने असंच काहीसं करून दाखवलंय. त्याने आपल्या मेंदूच्या शस्त्रक्रियेदरम्यान जराही न घाबरता या पूर्ण वेळ गिटार वाजवत गाणी म्हणत होता.
'सीएनएन'च्या माहितीनुसार अॅन्टोनी कुलकॅम्प डायस आपल्या ब्रेन ट्युमरच्या उपचारासाठी नोसा सॅनहोरा डा कॉनसिकाओ हॉस्पिटलमध्ये दाखल झाला होता. इथं त्याच्या मेंदूवर शस्त्रक्रिया करण्यात आली. परंतु या दरम्यान डायस जराही घाबरला नाही. इतकंच नाही तर यादरम्यान त्याने कमालीचा धीटपणा दाखवलाय. शस्त्रक्रियेदरम्यान त्याने तब्बल सहा गाणीही म्हणून दाखवली.
एका बँकेत नोकरी करणाऱ्या ३३ वर्षीय डायसच्या म्हणण्यानुसार, त्याच्या मुलाच्या जन्माच्या अगोदर काही दिवस त्याला आपल्या ब्रेन ट्यूमरची माहिती मिळाली.
डायसच्या मेंदूतील मेदांमध्ये वेदनेची जाणीवच हरवली होती. त्यामुळे अशा रूग्णाला जागं आणि वेदनारहित ठेवणे कठीण असतं. शस्त्रक्रियेदरम्यान डायस संपूर्ण वेळ जागाच होता. यावेळी त्याच्या ट्यूमरचा ९० टक्के भाग काढण्यात आला, अशी माहिती हॉस्पिटलमधील डॉक्टर जीन एड्रीउ मचाडो यांनी दिलीय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.