मुंबई: डिजिटल मार्केटिंगच्या जगात ऑनलाईन शॉपिंगला पर्याय नाही. पण तुम्ही ऑनलाईन स्पर्म शॉपिंगबद्दल ऐकलंय का?
चीनमधील पुरूष आपले स्पर्म्स ऑनलाईन शॉपिंग साईट्सवर विकत असल्याचं एका अहवालातून समोर आलंय. टाओबाओ नावाच्या या वेबसाईटनं पॅटर्निटी आणि स्पर्म टेस्ट करण्याची सुविधाही उपलब्ध करून दिली आहे. ही वेबसाईट भाड्यानं बॉयफ्रेंड पुरवण्याचाही दावा करते.
टाओबाओ शॉपिंग साईट अशा स्पर्म देणगीदाराला ४५ हजार रुपये किंमत देते, असं एका वृत्तात म्हटलंय. यामुळं चीनमधील पुरूषांमध्ये स्पर्म डोनेट करुन कमवण्याची चढाओढ सुरू झाली आहे. ज्या महिलांना ल्रग्न न करता सिंगल मदर व्हायचंय. त्या महिलांमध्ये या स्पर्मची जास्त मागणी होत असल्याचं या अहवालात म्हटलं आहे.
ही ग्लोबल ट्रेड वेबसाईट अलिबाबाच्या मालकीची आहे. या वेबसाईटवर भरपूर विचित्र अशा ऑफर संभाव्य ग्राहकांसाठी आहेत. याशिवाय स्तनातील दूधानं बनवलेला साबणही या वेबसाईटवर विकण्यास ठेवलेला आहे, असंही या अहवालात नमुद केलंय.
या स्पर्म देऊ करणाऱ्या वेबसाईटनं सुमारे २२ हजार लोकांना फक्त ४८ तासांत आकर्षित केले आहे. चीन वाढत्या नपुसंकसारख्या समस्येला तोंड देत असताना ऑनलाईन स्पर्म शॉपिंग हे एक वरदान म्हणून पाहिलं जाऊ शकतं.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.