पॅरिस: फ्रान्समध्ये एका जोडप्याचा ऐतिहासिक किल्ल्यावरून कोसळून मृत्यू झालाय. 'द इंडिपेंडेंट'च्या रिपोर्टनुसार शोजी आर्किपेलागो बेटावर वॉबान किल्ल्याच्या भिंतीवर सेक्स करतांना हे जोडपं घसरून खोल दरीत पडले. रिपोर्टनुसार 40 फूट खोल ही दरी होती. त्यात त्या दोघांचाही मृत्यू झालाय.
गुरूवारी सकाळी या जोडप्याचे मृतदेह नग्नावस्थेत बाहेर काढण्यात आले. दोघांचा जन्म 1984 सालचा होता. फ्रान्स मीडियामध्ये छापून आलेल्या बातमीनुसार, या जोडप्याचे कपडे किल्ल्यावरील भिंतीवर सापडले.
पुरुषाचा मृतदेह दरीतील सुकलेल्या भागात सापडला तर मुलीचा मृतदेह पाण्यात सापडला. पोलिसांच्या मते, ते दोघंही आपलं भान हरपून गेले होते, त्यात घसरून ते दरीत कोसळले.
(एजंसी इनपूटसह)
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.