वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांची पत्नी मेलानिया यांच्यातील संबंध बिघडल्याचे सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओतून दिसून येत आहे. त्यामुळे जोरदार चर्चा आहे.
डोनाल्ड ट्रम्प - मेलानिया यांच्यात बिनसले आहे. याबाबत ट्विटरवर नुकत्याच व्हायरल झालेल्या एका व्हिडिओवरुन या चर्चेला चांगलेच उधाण आले आहे. इतकेच नाही तर मागील कित्येक कालावधीपासून आपले ट्विटर हॅंडल न वापरणाऱ्या मेलानिया यांनी या पोस्टला लाईक केल्याचेही ट्विटरवर दिसते आहे.
Seems the only #Wall @realDonaldTrump's built is the one between him and @FLOTUS #Melania #trump pic.twitter.com/XiNd2jiLUF
— Andy Ostroy (@AndyOstroy) May 3, 2017
एका कार्यक्रमाच्या उद्घाटनाप्रसंगी डोनाल्ड ट्रम्प मेलानिया यांच्याकडे पाहात असताना त्या स्मितहास्य करत आहेत आणि अचानक ट्रम्प यांनी पुढे पाहिल्यावर त्यांच्या चेहऱ्यावर भाव एकदम बदलून गेलेत.