फ्लोरिडा : अमेरिकेचे नियोजित अध्यक्ष डॉनाल्ड़ ट्रम्प यांनी पुन्हा एकदा आपल्या अजब विचारांनी सर्वांनाच तोंडात बोटं घालायला भाग पाडलंय.
जगातला एकही कॉम्प्युटर सुरक्षित नाही. त्यामुळे तुम्हाला एखादी अत्यंत महत्वाची गोष्ट कुणाला कळवायची असेल तर त्यासाठी ईमेल न वापरता ती हातानं लिहून कुरिअरनं पाठवा असा अजब सल्ला ट्रम्प यांनी दिलाय.
वॉशिंग्टनमध्ये नवीन वर्षाच्या सुरूवातीला आयोजित एका पार्टीनंतर ते पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे विधान केलंय. एकीकडे भारतात डीजिटल इंडिया, स्मार्ट सिटी अशा घोषणा करून कॉम्प्युटरच्या वापरावर जास्तीत जास्त भर देत असताना ट्रम्प यांचं हे विधान अतिशय महत्वाचं ठरतंय.
अमेरिकेतील कॉम्प्युटरचा वापर, आणि त्याच्या संल्गन उद्योगांसाठीही ट्रम्प यांनी केलेलं हे विधान येत्या काळात मोठं आव्हानच ठरणार आहे.