मुंबई : कर्करोगग्रस्तांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. लिम्फोसिटीक ल्युकेमिया या रक्ताच्या कर्करोगग्रस्त रुग्णांकरताच्या औषधाला ऑस्ट्रेलिया प्रशासनानं मान्यता दिली आहे.
'वेनक्लेक्स्टा' नावाचं हे औषध, मेलबॉर्नमध्या वेनेटोक्लॅक्समध्ये विकसित करण्यात आलं आहे. कर्करोगाच्या पेशींच्या वाढीला सहाय्यक ठरणा-या बी सी एल 2 या प्रोटिनला वेनक्लेक्स्टा हे औषध वितळवण्याचं आणि नियंत्रणात ठेवण्याचं काम करतं.
दिवसाला ही एक गोळी रुग्णांना घ्यावी लागणार आहे. चौथ्या स्टेजमधल्या कर्करुग्णांना सुद्धा हे औषध देता येणार आहे.
विशेष म्हणजे केमोथेरपी घेऊ न शकणारे तसंच इतर उपचारांना प्रतिसाद न देणाऱ्या कर्करुग्णांनाही वेनक्लेक्स्टा हे औषध घेता येणार आहे.