www.24taas.com, वृत्तसंस्था, लॉस एंजिलिस
ड्राय आईसच्या एका प्लॅस्टिकच्या बाटलीचा स्फोट झाल्यानं आज लॉस एंजिलिसच्या चार विमानांचं उड्डाणं रद्द करावं लागलं. आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतुकीमध्ये असा प्रकार पहिल्यांदाच घडलाय.
लॉस एंजिलिस आंतरराष्ट्रीय विमानतळावरील एका टर्मिनलवर ड्राय आईसनं भरलेल्या एका प्लॅस्टिकच्या बाटलीचा स्फोट झाला. `रासायनिक प्रक्रियांमुळं संध्याकाळी हा स्फोट झाला. टर्मिनल क्रमांक दोनमधील एका कर्मचाऱ्याच्या खोलीत हा प्रकार घडला,` असं याबाबत फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनच्या (एफबीआय) प्रवक्त्या लॉरा ऐमिलर यांनी सांगितलंय.
बंद खोलीत ही घटना घडल्यानं कोणीही जखमी झालं नाही. मात्र, खबरदारी म्हणून विमानतळ प्रशासनानं हे टर्मिनल बंद करून पुरावे तपासून पडताळणी केली. तसंच, येणाऱ्या आणि जाणाऱ्या प्रवाशांची तपासणी काही वेळ बंद ठेवण्यात आली. त्यामुळं सुरक्षेच्या कारणास्तव विमानांची उड्डाणंही तात्पुरती रद्द करून पुढं ढकलण्यात आली, असं लॉरा यांनी सांगितलं.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.