www.24taas.com, क्वीन्सलँड
भूकंपामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याचं आपण अनेकवेळा पाहिलं आहे. पण न्यूझीलंडमध्ये मात्र भूकंपामुळे वेगळीच घटना घडू लागली आहे. न्यूझीलंडमध्ये भूकंपामुळे पाण्याचं रुपांतर सोन्यात होत आहे.
क्वीन्सलँड युनिव्हर्सिटीचे संशोधक डियॉन वेदरले यांनी यासंदर्भात संशोधन केलं आहे. वेदरले यांनी असा निष्कर्ष काढला आहे, की भूकंपामध्ये पृथ्वीच्या गर्भातील पाणी गरम होत जमिनीच्या भेगांमधून वर येऊ लागतं. याच भेगांमध्ये पाण्यासोबत अनेक मौल्यवान धातू आणि क्वार्ट्झ यांचा संयोग होऊन सोनं निर्माण होतं.
पृथ्वीच्या पोटात १० किलोमीटर अंतरावर दाब वाढल्यामुळे पाण्यासोबत कार्बन डाय ऑक्साइड, सिलीका आणि सोन्यासारखे धातू वर येऊ लागतात. या प्रक्रियेला हजारो वर्षं लागतात. पण न्यूझीलंडमध्ये ही प्रक्रिया वेगाने घडत आहे. लाखो वर्षांनी या स्थळी सोन्याच्या खाणी तयार होतील.