पोर्ट स्टेपस्टन : आपल्या आकारापेक्षा अधिक वजनाची साळींदर (काटेरी मांजर) खाऊन आफ्रिकेतील एका अजगराला प्राण गमावावा लागला आहे.
३.९ मीटर लांब असलेला हा आफ्रिकन रॉक पायथन (अजगर) काही माउंटर बायकर्सला मृत अवस्थेत सापडला. दक्षिण आफ्रिकेतील पोर्ट स्टेप्स्टन येथील एलंड गेम रिसर्व्ह लेकच्या सायकल ट्रॅकवर हा अजगर मृतावस्थेत सापडला.
या अजगराने काटेरी मांजर खाली पण या मांजराने आपले काटे अजगराच्या पोटात उभे केल्याने अजगराला शरिराच्या आतून अनेक ठिकाणी जखमा झाल्या आणि टायर पंक्चर व्हावे तसेच अजगराचे शरीर पंक्चर झाले.
अजूनही अजगर का मरण पावला याचे कारण समजू शकले नसल्याचे अभयारण्याच्या व्यवस्थापक जेनिफर फुलर यांनी सांगितले. परंतु, अजगराच्या पचन नलिकेला साळींदरच्या काट्यांनी फाटून टाकले असल्यामुळे हा मृत्यू झाल्याचे प्रथमदर्शीनी वाटते आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.