मुंबई : नासाने मंगळवारी मंगळ ग्रहावर काच सापडली असल्याचं म्हटलं आहे, यामुळे मंगळावर जीवसृष्टी असण्याची शक्यता वाढली आहे. मंगळाच्या कक्षेत फिरून मंगळाचा अभ्यास करणाऱ्या नासाच्या अवकाशयानाला काचेचा संचय सापडला असल्याचे नासाने म्हटलंय, त्यामुळे तेथे पूर्वी जीवसृष्टीची शक्यता व्यक्त करण्यास बळ मिळालंय.
नासाच्या म्हणण्यानुसार काचेचा संचय सापडल्याने प्राचीनकाळी तेथे जीवसृष्टी असण्यास बळ मिळते. या नव्या संशोधनामुळे मंगळावरील जीवसृष्टीबाबतचा अभ्यास करण्यास नवी दृष्टी मिळाल्याचेही नासाने पुढे म्हटले आहे. "काचेच्या या संचयामुळे मंगळावर पूर्वी जीवसृष्टी असण्याच्या शक्यतेस वाव मिळणार आहे‘ असे नासाच्या वतीने सांगण्यात आले आहे.
नासाच्या याच यानाने मंगळावरील मातीचे नमुने गोळा केले आहेत, ते घेऊन तो पृथ्वीवर येण्याची शक्यता आहे. याच यानाला मंगळावरील विवरामध्ये काचेचा संचय सापडला आहे.
नीली फोस्से नावाच्या विवरापासून ६५० किलोमीटर अंतरावर हा संचय सापडला आहे. गेल्या काही वर्षात झालेल्या संशोधनात पृथ्वीवरील पूर्वीच्या जीवसृष्टीने आपला पुरावा काचेच्या स्वरुपात जतन करून ठेवल्याची माहिती समोर आली आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.