बैरूत : ISISकडून क्रूरपणे शिरच्छेद केल्याचे व्हिडिओ आपण यू-ट्युबवर पाहिले असतील. यात जो क्रूरपणे शिरच्छेद करतो, तोच दहशतवादी हवाई हल्ल्यात ठार झाल्याचे वृत्त आहे. 'जिहादी जॉन' हल्ल्यात मारला गेल्याला ISISने दुजोरा दिलाय.
' इसिस' कडून अनेक बंदीवानांचा अतिशय क्रूरपणे मुंडके छाटण्यात येत होते. याचे माक 'जिहादी जॉन' हा दहशतवादी करत होता. तो हवाई हल्ल्यात ठार झाल्याचे वृत्त असून असून इसिसने या वृत्ताला दुजोरा दिलाय. अमेरिकेच्या ड्रोन विमानाने हल्ला चढवला होता. यात तो ठार झाल्याचे सांगण्यात येत आहे.
मोहम्मद एमवाझी तथा जिहादी जॉन या नावाने तो ओळखला जातो. जॉन गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्येच ड्रोन हल्ल्याच मृत्यूमुखी पडला. 'दाबिक' या ऑनलाइन मॅगझीनमधून इसिसने जिहादी जॉनचा मृत्यू झाल्याचा दावा केलाय.
जिहादी जॉन हा ब्रिटीश नागरिक होता आणि गेल्यावर्षी त्याची ओळख पटली होती. सीरियातील इसिसचा प्रभाव असलेल्या 'राक्काट शहरात मोटारीतून जात असताना ड्रोनमधून हल्ला करण्यात आला होता. १२ नोव्हेंबरला झालेल्या हल्ल्यात जॉनची मोटार पूर्णपणे बेचीराख झाल्याचे या मॅगझीनमध्ये म्हटलेय.