मेक्सिको : मेक्सिकोमधल्या एका गावातील महापौरांचं लग्न एक मगरीशी लावण्यात आलंय... अजब वाटलं ना!... पण, होय हे खरं आहे.
खरं तर स्थानिक परंपरा म्हणून या ठिकाणच्या महापौरांचं लग्न मगरीशी लावण्यात येत. मेक्सिकोतील सॅन पेड्रो हुआमेलुला ह्या गावात मासेमारी व्यवसाय तेजीत चालण्यासाठी १८ व्या वर्षापासून ही पद्धत चालत आलेली आहे.
या गावातील लोकांचा प्रमुख व्यवसाय आहे मासेमारी... आपलं पोट भरण्यासाठी मुबलक प्रमाणात मासे मिळावेत, यासाठी दरवर्षी इथल्या महापौरांचा विवाह मगरीशी लावला जातो.
गेल्याच आठवड्यात येथील महापौरांचा विवाह मारिया इसाबेला नावाच्या मगरीशी पार पडला. लग्नाच्या वेळी नवरी मारिया इसाबेला हिला पांढरे कपडे घातले होते. तसेच काळजीपोटी मगरीचं तोंडही बंद करण्यात आलं होतं.
परंपरेनुसार त्या मगरीला राणी म्हणून संबोधले जातं. प्रत्येक गावाच्या काही प्रथा-परंपरा असतात, पण मगरीशी लग्न लावण्याची पद्धत जरा अजबच असली... तरी शेवटी परंपराच ती...
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.