ओसामा बिन लादेनवर गोळ्या झाडणारा हाच तो अमेरिकन चेहरा...

‘अलकायदा’ या दहशतवादी संघटनेचा प्रमुख ओसामा बिन लादेन याला मृत्यूच्या दारात ढकलणाऱ्या ‘अमेरिकन नेव्ही सील टीम - सिक्स’च्या सैनिकाचा चेहरा जगासमोर आणला गेलाय.

Updated: Nov 6, 2014, 01:11 PM IST
ओसामा बिन लादेनवर गोळ्या झाडणारा हाच तो अमेरिकन चेहरा...  title=

नवी दिल्ली : ‘अलकायदा’ या दहशतवादी संघटनेचा प्रमुख ओसामा बिन लादेन याला मृत्यूच्या दारात ढकलणाऱ्या ‘अमेरिकन नेव्ही सील टीम - सिक्स’च्या सैनिकाचा चेहरा जगासमोर आणला गेलाय.

अमेरिकेच्या या सैनिकाचं नाव आहे रॉब ओ नील... यानंच ओसामा बिन लादेनच्या डोक्यात तीन गोळ्या झाडून त्याला जागेवरच ठार केलं होतं... या गोळ्या नीलच्या बंदूकीतूनच निघाल्या होत्या. 

अमेरिकन टेलीव्हिजन नेटवर्क फॉक्स न्यूजनं ओ निलला जगासमोर आणलंय. लवकरच, नील स्वत: ‘मिशन ओसामा’शी निगडीत अनेक रहस्यमय गोष्टी सांगणार आहे. ११ मे २०११ रोजी पाकिस्तानच्या एबटाबादमध्ये अलकायदाचा प्रमुख ओसामाला अमेरिकन नेव्ही सील टीम सिक्सनं आपला निशाणा बनवलं होतं. हे मिशन अत्यंत गुप्त पद्धतीनं पूर्ण करण्यात आलं.


मिशन ओसामा

हॉलिवूडनं नीलचं पात्र झीरो डार्क थर्टी, कॅप्टन फिलिप्स तसंच लोन सरवायवर यांसारख्या सिनेमांत रंगवलंय. 

मोंटानामध्ये लहानाचा मोठा झालेल्या नीलची ओळख सर्वात अगोदर sofrep.com नावाच्या एका वेबसाईटनं केलंय. ही वेबसाईट मिलेट्रीशी निगडीत लोकांसाठी काम करते. १६ वर्षांच्या सेवेनंतर निवृत्त झालेला नील आत्ता भाषण देण्याचं काम करतो. अमेरिकन सेनेत नीलला ५२ मेडल मिळालेले आहेत. भाषण देण्यासाठी त्याला अधिकृतरित्या पैसे दिले जातात. 

सरकारकडून पेंशन आणि स्वास्थ्यासंबंधी सेवा न मिळण्याबद्दल नीलनं सरकारला एक पत्रही लिहिलंय. वर्ष २०११ मध्ये ‘सीएनएन’च्या म्हणण्यानुसार, नीलला ‘मिशन ओसामा’शी निगडीत अनेक गोष्टी वाढवून-चढवून बोलण्याच्या आरोपाखाली ‘सील टीम सिक्स’मधून बाहेर केलं होतं.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.