अतिरेकी संघटना जमात-उल-अहरारने PM मोदींना दिली धमकी

भारत पाकिस्तानमधील वाघा सीमारेषेजवळ या आठवड्यामध्ये  बॉम्बस्फोट घडवून आणणाऱ्या जमात-उल-अहरारने सुडाची भाषा केली आहे. भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टार्गेट करण्याचा इरादा स्पष्ट केला आहे.

Updated: Nov 5, 2014, 02:35 PM IST
अतिरेकी संघटना जमात-उल-अहरारने PM मोदींना दिली धमकी title=

नवी दिल्ली :भारत पाकिस्तानमधील वाघा सीमारेषेजवळ या आठवड्यामध्ये  बॉम्बस्फोट घडवून आणणाऱ्या जमात-उल-अहरारने सुडाची भाषा केली आहे. भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टार्गेट करण्याचा इरादा स्पष्ट केला आहे.

या संघटनेने वाघा सीमेवरील स्फोटाची जबाबदारी स्विकारली आहे. काश्‍मीर व गुजरातमधील निष्पाप मुसलमानांच्या हत्येचा आम्ही सूड घेऊ, असा ईशारा  तेहरिक-इ-तालिबान पाकिस्तान जमात-उल-अहरार या दहशतवादी संघटनेचा प्रवक्ता अहसानुल्ला अहसन याने दिला आहे. एहसान याने अशा आशयाचे ट्‌विट केले होते. या ट्‌विटची विश्‍वासार्हता तपासण्यात येत आहे.
 
सीमारेषेपलीकडील दोन्ही देशांना हा हल्ला म्हणजे इशारा आहे. आम्ही जर सीमारेषेच्या या बाजुला हल्ला करु शकतो; तर त्याही बाजुला आम्ही हल्ला करु शकतो. मोदी यांनी शेकडो मुस्लिमामांची हत्या केली आहे. त्याचा आम्हाला  बदला घ्यायचा आहे, असे अहसानुल्ला अहसनने म्हटले आहे.

ही नवी संघटना पाकिस्तानमधील तालिबानच्या मुख्य संघटनेमधून फुटून बाहेर पडली आहे. अल कायदा या जागतिक दहशतवादी संघटनेचा नेता अयमान अल जवाहिरी याचा या संघटनेला पाठिंबा आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.