हवाई, अमेरिका : अमेरिकेतील हवाई बेटावरील किलाऊ ज्वालामुखीच्या लाव्हारसानं पहाऊच्या नागरी वस्तीलाही धोका निर्माण केलाय. अध्यक्ष ओबामा यांनी ही मोठी दुर्घटना असल्याचं म्हटलयं. या दुर्घटनेपासून स्थानिक लोकांना वाचवण्यासाठी सर्व प्रयत्न केले जातील असं ओबामांनी स्पष्ट केलयं.
किलाऊ ज्वालामुखी सक्रीय असला तरी त्यानं या आधी नागरी वस्तींना धोका निर्माण केला नव्हता. पण आता पहाऊच्या लोकांसाठी हा ज्वालामुखी मोठा धोका ठरतोय, लाव्हारस पाच यार्ड प्रती तास या वेगानं पुढं सरकत असल्यानं प्रशासन चिंतित आहे.
पाहा व्हा व्हिडिओ –
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.