हैदराबाद : नेपाळ आणि भारताच्या काही भागांना प्रयलकारी भूकंपाने हादरा दिला. याची तीव्रता रिश्टर स्केलवर ७.९ इतकी नोंदविण्यात आली. या भूकंपाला भीषण भूकंपाच्या श्रेणीत गणले जाते. याचा प्रभाव पुढील १०-१५ दिवसांपर्यंत राहण्याची शक्यता असल्याचे राष्ट्रीय भूभौतिकीय संशोधन संस्थेचे भूगर्भ वैज्ञानिक आर. के. चड्ढा यांनी सांगितले.
चड्ढा यांनी सांगितले की, याची तीव्रता पाहता. याला भीषण भूकंप म्हणता येईल. याचे झटके पुढील १० ते १५ दिवस जाणवतील. हे झटके हलके असतील आणि त्यांची तीव्रता कमी होईल. एनजीआरआयने केलेल्या भूकंप मापनानुसार दुपारी ११ वाजून ४१ मिनिटांनी काठमांडूपासून ८० किलोमीटर वायव्येला जमीनीच्या खाली १५ किलोमीटर होते.
अशा प्रकारचा भूकंप नेपाळच्या क्षेत्रात यापूर्वी १९३४ मध्ये आला होता. १९३४ मध्ये नेपाळ-बिहार सीमेवर आलेल्या या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ८.४ वर मोजण्यात आली होती.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.