झाग्रेब : मानाचा पुरस्कार स्विकारताना क्रोएशियन हेलसिंकी कमिटी फॉर ह्यूमन राइट्सचे प्रमुख इवान वोनीमीर सीसाक यांची पॅंट खाली आली आणि उपस्थितांमध्ये चुळबूळ सुरु झाली. या क्षणाची छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
व्हिडिओ सर्वात बातमीच्या खाली
देशाच्या राष्ट्रपती कोलिंदा ग्रैबर-कितारोविक यांच्या हस्ते इवान वोनीमीर सीसाक यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी त्यांची पॅंट चक्क खालीच आली. त्यामुळे क्षणभर कार्यक्रमात उपस्थितांच्या चेहऱ्यावर हासू आले.
इवान वोनीमीर सीसाक यांची पॅंट निसटली, यावेळी त्यांची अवघड परिस्थिती निर्माण झाली होती. त्यानंतर त्यांनी स्वतःला सावरत पॅंट पुन्हा वर घेत बक्कल लावले.
पाहा व्हिडिओ :
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.