पेशावर : पाकिस्तानातील पेशावरमधील मशिदीवर दहशतवादी हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात ११ जणांचा बळी गेलाय. या हल्ल्यात ६० पेक्षा जास्त जण जखमी झालेत.
शुक्रमावीर नमाज पडण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती. दहशतवाद्यांनी मशिदीवर अंधाधुंद गोळीबार करीत हल्ला केला. तसेच यावेळी स्फोट घडवून आणले. ६ ते ७ स्फोट झालेत.
दरम्यान, हल्ल्यानंतर एका दहशतवाद्यांने स्वत:ला उडवून दिले. मशिदीबाहेर थांबून थांबून गोळीबार करण्यात आला. मशिदीत ६ अतिरेकी लपल्याचे सांगण्यात येत आहे. मशिदीमध्ये साधारण १,००० लोक उपस्थित होते.
सुरक्षा रक्षकांनी मशिदीला चारही बाजूने घेरले आहे. तर हल्ल्यात जखमी झालेल्यांना हयाताबाद येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.