ब्रिटीश पॉप गायक जॉर्ज मायकल यांचे निधन

सुप्रसिद्ध ब्रिटीश पॉप गायक जॉर्ज मायकलचं रात्री उशिरा निधन झालं. तो 53 वर्षांचा होता. ऐन ख्रिसमसच्या संध्याकाळी जार्जनं जगाचा निरोप घेतल्यानं संपूर्ण जगात हळहळ व्यक्त होत आहे. 

Updated: Dec 26, 2016, 08:51 AM IST
ब्रिटीश पॉप गायक जॉर्ज मायकल यांचे निधन title=

लंडन : सुप्रसिद्ध ब्रिटीश पॉप गायक जॉर्ज मायकलचं रात्री उशिरा निधन झालं. तो 53 वर्षांचा होता. ऐन ख्रिसमसच्या संध्याकाळी जार्जनं जगाचा निरोप घेतल्यानं संपूर्ण जगात हळहळ व्यक्त होत आहे. 

जॉर्जच्या मृत्यूचं कारण जाहीर करण्यास त्याच्या कुटुंबियांनी तूर्तास नकार दिलाय. जॉर्जच्या जाण्यानं झालेल्या दुःखातून सावरण्यासाठी त्याच्या कुटुंबियांनी वेळ मागितला आहे. येत्या काही दिवसात जॉर्जच्या संपूर्ण आयुष्यावर बेतलेली एक डॉक्युमेंटरी फिल्म प्रदर्शित होणार होती.  

अनेक वर्ष सार्वजनिक आयुष्यापासून लांब गेलेल्या जॉर्ज आयुष्य ड्रग्जच्या आहारी गेल्यानं काही दिवसांपूर्वी पुन्हा चर्चेत आला. क्लब ट्रॉपिकाना, लास्ट ख्रिसमस, केअर विस्पर आणि फेथ हे त्याचे काही गाजलेले अल्बम होते.  2011मध्ये जॉर्जला निमोनियानं ग्रासलं. त्यानंतर तो अनेक महिने व्हिएन्नामध्ये रुग्णालयात उपचार घेत होता.  त्याच्या अचानक जाण्यानं पॉप संगीतातला एक मोठा तारा निखळल्याची भावना जगभरात व्यक्त होतेय.