पॅरीस : फान्सच्या सूरक्षा यंत्रणांना पॅरीस बॉम्बस्फोटाच्या मुख्य सूत्रधारापर्यंत पोहचण्यात यश मिळाल्याचं सांगण्यात येतंय. संशयित मूख्य सूत्रधार बेल्जियमचा रहिवासी असून अब्दुल हामिद अब्बाऊद असं त्याचं नाव असल्याची माहिती मिळतेय.
दोनच दिवसापूर्वी पॅरिसमध्ये एकूण सहा ठिकाणी दहशतवादी हल्ला झाला. त्यात अनेक मृत्यू झाले. पण ठोस असं काहीच हाती आलेल नंव्हतं. त्या पार्श्वभूमीवर आज मुख्य सूत्रधाराची ओळख पटल्यानं मोठं यश हाती लागल्याचं मानलं जातंय.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पॅरीस हल्ल्याचा मूख्य सूत्रधार बेल्जियमच्या इस्लामिक स्टेट दहशतवादी संघटनेशी निगडीत आहे. जानेवारीमध्ये उद्ध्वस्त करण्यात आलेल्या एका तुकडीचा तो प्रमुख होता.
यापूर्वी, अधिकाऱ्यांनी दोन हल्लेखोरांना संशयित म्हणून ताब्यात घेतल्याचं म्हटलं होतं. त्यांच्या म्हणण्यानुसार २८ वर्षीय सॅमी एमीमॉर बाटाक्लॅन कॉन्सर्ट हॉलमध्ये ८९ लोकांची हत्या केली होती. त्यासोबतच एका हल्लेखोराचा फोटोही जारी करण्यात आलाय. आज सकाळी फ्रेंच पंतप्रधान वेल्स यांनी युरोपात आणखी हल्ले होण्याची शक्यता वर्तवलीय. त्यामुळे संपूर्ण युरोपात आणखी काही दिवस अलर्ट कायम राहणार हे निश्चित झालंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.