अंतराळवीर सुनीता विलीयम्सही झाल्या मोदींच्या फॅन

परदेश दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा अमेरिकेत पोहोचले तेव्हा ते सगळ्यात आधी आर्लिंगटन सिमेट्रीला गेले. त्यानंतर ते अमेरिकेतील स्पेस शटल कोलंबिया येथील मेमोरियलमध्ये गेले जेथे मोदींनी मूळ भारतीय वशांची अंतराळवीर सुनीता विलीयम्स आणि तीच्या वडिलांची भेट घेतली.

Updated: Jun 8, 2016, 01:55 PM IST
अंतराळवीर सुनीता विलीयम्सही झाल्या मोदींच्या फॅन title=

वॉशिंग्टन : परदेश दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा अमेरिकेत पोहोचले तेव्हा ते सगळ्यात आधी आर्लिंगटन सिमेट्रीला गेले. त्यानंतर ते अमेरिकेतील स्पेस शटल कोलंबिया येथील मेमोरियलमध्ये गेले जेथे मोदींनी मूळ भारतीय वशांची अंतराळवीर सुनीता विलीयम्स आणि तीच्या वडिलांची भेट घेतली.

सुनीता विलीयम्सला जेव्हा भेटीबाबत विचारण्यात आलं तेव्हा त्या म्हणाल्या की मोदी सर्वात पहिले माझ्या वडिलांना भेटले. मोदींनी आम्हाला भारतात येण्याचे आमंत्रणही दिले. नासा या अमेरिकेच्या अंतराळ संशोधन संस्थेत सुनीता या असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम करत आहेत. मोदींनी आम्हाला दिलेले निमंत्रण ही आमच्याकरिता सन्मानाची गोष्ट आहे असे विलीयम्सनी सांगितले. त्याचबरोबर अंतरिक्ष विज्ञान या क्षेत्रात अमेरिका- भारतसोबत काम करायलाही आवडेल अशी इच्छा विलीयम्सनी व्यक्त केली. .

त्याचवेळी आर्लिंगटन सिमेट्री येथे मोदींनी कल्पना चावला यांना श्रद्धांजली व्हायली आणि कल्पनाच्या कुटुंबालाही भेट दिली. तेव्हा सुनीता विलीयम्सने सांगितले की कल्पना चावला या एक महान अंतराळवीर होत्या आणि माझी तिच्यासोबत खूप चांगली मैत्रीही होती.