भारत-पाक सामन्यांना तालिबानची धमकी

अनेक जणांचा विरोध डावलून शनिवारी पाकिस्तान संघाचं भारतात आगमन झालं. शिवसेनेने भारत-पाक सामन्यांना यापूर्वीच विरोध दर्शवला आहे. आता तालिबाननेही भारत- पाक सामन्यांचा निषेध करत हे सामने झाल्यास हिंसक कारवाई करण्याची धमकीही दिली आहे.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Dec 23, 2012, 08:43 PM IST

www.24taas.com, इस्लामाबाद
अनेक जणांचा विरोध डावलून शनिवारी पाकिस्तान संघाचं भारतात आगमन झालं. शिवसेनेने भारत-पाक सामन्यांना यापूर्वीच विरोध दर्शवला आहे. आता तालिबाननेही भारत- पाक सामन्यांचा निषेध करत हे सामने झाल्यास हिंसक कारवाई करण्याची धमकीही दिली आहे.
पाकिस्तानी खेळाडूंचा भारतीय दौरा ही निंदनीय बाब आहे. हा दौरा ताबडतोब रद्द करावा. आमच्या आदेशाचं पालन न केल्यास आम्ही भारतात हिंसक कारवाया करू अशी धमकी देणारा एक इ-मेल ‘तहरिक-ए-तालिबान’ या संघटनेकडून आला आहे. हा इ-मेल एहसानुल्ला एकसान याने पाठवला आहे.
“जर भारत-पाकिस्तान सामने झाले, तर अल्लाचे बंदे असणारे आमच्या तहरिक-ए-पाकिस्तानचे लोक या गोष्टीचा बदला घेतील. भारतामध्ये आम्ही हिंसक कारवाया घडवून आणू.” असं या इ-मेल मध्ये लिहीलेलं आहे.